पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर योजनेची जनजागृती

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 30/05/2023 6:30 PM



गडचिरोली,(जिमाका)दि.30: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतात. त्यानुषंगाने मा. मंत्री महोदय, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे जिल्हा परीषद हायस्कुल सभागृहात दिनांक 29 मे 2023 रोजी आयोजन करण्यात आले.
महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणारी केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही योजना पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा / सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन, कायदेशीर, पोलीस व निवास अशा सेवा / सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे. सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविने गरजेचे आहे. 
त्याकरीता सदर शिबीराच्या माध्यमातुन सखी वन स्टॉप सेंटर योजनेची माहितीपर जनजागृती स्टॉल लावुन विविध महिला व‍ नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली. आपल्या जवळपास पीडीत महिला व बालके आढळल्यास 181, 112, 1098, 1091, 155209 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तथा जिल्ह्यातील  सखी वन स्टॉप सेंटर ला संपर्क (07132-295675) करण्याचे आवहन करण्यात आले. त्याप्रमाणे सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉल ला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशी पीडीत महिला व बालके आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटर ला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन देवेंद्रजी वाडके, तहसिलदार धानोरा, के.पी. कटरे, सी.डी.पी.ओ., श्री. टिचकुले बी.डी.ओ, धानोरा,  बारसागडे, विस्तार अधिकारी,  गेडाम मॅडम, सुपरवाईजर अंगणवाडी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
सखी वन स्टॉप सेंटर योजनेच्या दिनांक 29 मे 2023 रोजी आयोजित एक दिवसीय जनजागृती शिबीराच्या यशस्वीते करिता  प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली तथा  रुपाली काळे, संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली च्या केंद्र प्रशासक संगिता वरगंटीवार व समुपदेशक प्रणाली सुर्वे यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पडले. तथा संपूर्ण शिबीर एम. आर. करंगामी संरक्षण अधिकारी, धानोरा यांच्या नियोजनात पार पडले.
****

Share

Other News

ताज्या बातम्या