भगूरकराना जो विकासाचा शब्द दिला त्या दिशेने खऱ्या अर्थाने वाटचाल :- आमदार सरोजताई आहिरे
भगुर वार्ताहर:- भगुर शहरातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावत भगूर शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन भगूर शहराचा विकास नक्कीच करणार सहा महिन्यातच भगूर शहरात विकास कामांची गंगा वाहत असल्याचे प्रतिपादन देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे यांनी भगूर स्मशानभूमी भुमिपुजनच्या कार्यक्रम प्रसंगी सभेत बोलताना केले.
भगूर येथील नवीन स्मशानभूमी कामासाठी ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले त्यांचे भुमिपुजन कार्यक्रम करण्यात आला तसेच भगूर येथील ग्राम महसूल अधिकारी (मंडळ )कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम ही पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सरोजताई अहिरे बोलत होत्या पुढे बोलताना त्यांनी सांगितले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील. या माध्यमातून भगूरच्या विकासाला आणखीन गती मिळणार आहे. तसेच माजीमंत्री माणिकराव कोकाटे व मी सरोज आहिरे दोन आमदारांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी बैठकीत बोरखिंड इंटरचेंजसाठी ३४३ कोटी रुपये मंजूर केले आहे. असेही त्यांनी सांगितले यासह विविध विषयावर विरोधी गटाचा समाचार आमदार अहिरे यांनी आपल्या भाषणात घेतला.व्यासपीठावर भगूर नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे,मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल,विश्वहिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकनाथराव शेटे,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाजप नेते तानाजी करंजकर,राष्ट्रवादीचे विष्णुपंत म्हैसधुने,उपनगराध्यक्ष प्रसाद आडके,नगरसेवक दिपक बलकवडे,विशाल बलकवडे,बांधकाम सभापती काकासाहेब देशमुख,ज्येष्ठनेते शिवाजी करंजकर,नगरसेवक डॉ.मृत्युंजय कापसे,अमोल इंदारखे,बबलू जाधव नगरसेविका विद्या बलकवडे,जयश्री देशमुख,लता थापेकर,सुजाता शिरसाट,अश्विनी भवार उपस्थित होते. जेष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख,शिवाजी करंजकर यांनी भगूरच्या विकास कामांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास किशोर कुंडारीया,रमेश पवार,प्रशांत कापसे,बाळासाहेब मस्के, विलास धुर्जड,निलेश हासे,सिद्धेश मुळे, बाळासाहेब पानसरे बाळासाहेब कासार,संदीप शेटे,मनसेचे तालुकाप्रमुख नितीन काळे,मनसेचे शहर प्रमुख सुमित चव्हाण,उपशहर प्रमुख श्याम देशमुख रविंद्र संसारे,मधुकर कापसे,विशाल शिरसाट,वसंत खैरनार,चंद्रशेखर ओहोळ,कचरु इंदारखे,युनुस शेख,मारुती कोरडे,अनिल कासार आदीसह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उबाठा,मनसे गटाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संदीप शेटे यांनी मानले.
कोट
भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भगूरकरांना दिलेल्या विकास कामांच्या वचननाम्यानुसार आज शहराच्या चारी बाजूंनी विकास कामे सुरू आहेत पुढील काळात भगूरकरांना अद्यावत नागरी सुख सुविधा युक्त भगूरचा विकास पहावयास मिळेल भगूर शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांच्या अनमोल सहकार्याने शहराच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्धच राहील आमदार सरोजताई अहिरे यांचे विशेष आभार.
प्रेरणा बलकवडे
नगराध्यक्ष भगूर नगरपरिषद