ताज्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय : उद्यापासून राज्यातील दुकाने सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत खुली राहणार..

  • post author मुख्यसंपादक
  • Upadted: 7/8/2020 11:09:07 AM

मुंबई;-राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी 2 तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या, 9 जुलैपासून राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी काल काढले आहेत. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमधील कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील 7 दिवस परवानगी देण्यात आली आहे. या क्षेत्रातील दुकानांना पी वन-पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. आता यात 2 तास वाढवून दिलेले आहेत. तर राज्याच्या उर्वरित भागात आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी 2 तास वाढवून देण्यात आले आहेत. मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील 7 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासनाकडून संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद केली जातील. दुकाने किंवा मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या 2 तास वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.