शंकरराव चव्हाण महाविद्यालयात विविध आजारांची तपासणी व समुपदेशन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/03/2023 5:53 PM

नांदेड :- अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात प्राणीशास्त्र,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन  कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राणीशास्त्र विभाग (MoU)आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के .के. पाटील होते ‌. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा गोरे
(डी.आ.टी.ई. फाउंडेशन संचालक),  पी. व्ही .सोनवणे (क्षयरोग सुपरवायझर ) आदिनाथ साखरे (कुष्ठरोग तंत्रज्ञान ) ,शेख फरीद( बीसीएम),  अनिता चव्हाण यांची उपस्थिती होती .प्रस्तुत कार्यक्रमामध्ये मा .श्री साखरे , श्री सोनवणे, मा.शेख यांनी सिकलसेल आजार, क्षयरोग, कुष्ठरोग व महिलांची साक्षरता किती महत्त्वाची आहे . यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले . प्राचार्य डॉ. के .के. पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर. बी. शेटे यांनी केले . तर आभार डॉ. व्ही.बी. लोणे यांनी मानले .कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या