मिरजेत स्वतंत्र सेन्ट्रल पोलीस बिल्डींग उभारावे : मिरज सुधार समिति

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/03/2023 8:09 AM


***महात्मा गांधी, शहर, वाहतूक नियंत्रण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय एकाच ठिकाणी सुरु करा 
मिरज सुधार समितीची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी....
________________________________________ 

 मिरज शहर पोलीस ठाण्याच्या सुमारे दीड एकर जागेत प्रशस्त सेन्ट्रल पोलीस बिल्डिंग उभी करून त्या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी पोलीस ठाणे, वाहतूक नियंत्रण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे एकत्र कामकाज सुरु करावे, अशी मागणी मिरज सुधार समितीने कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते. 

गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मिरज रेल्वे जंक्शन पोलीस चौकीच्या उदघाटन कार्यक्रमाला आले असता मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, कार्यवाह जहीर मुजावर, महिला अध्यक्ष सौ. गीतांजली पाटील, युवा अध्यक्ष सुबहान सौदागर, अक्षय वाघमारे, श्रीकांत महाजन, सलीम खतीब, अस्लम नदाफ, मकसूद भादि आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  मिरज शहराचा विस्तार वाढल्याने मिरज शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी पोलीस ठाणे असे विभाजन करण्यात आले. मात्र, यामुळे नागरिकांची सोय होण्या ऐवजी गैरसोय होत आहे. सद्याची महात्मा गांधी पोलीस ठाणे महापालिकेच्या भाड्याच्या जागेत आहे. म्हणून  मिरज शहर पोलीस ठाण्याच्या सुमारे दीड एकर जागेत प्रशस्त सेन्ट्रल पोलीस बिल्डिंग उभी करून त्या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी पोलीस ठाणे, वाहतूक नियंत्रण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे एकत्र कामकाज सुरु केल्यास प्रशासन गतिमान होऊन नागरिकांची सोय होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या