शिक्षक हक्क चळवळ समितीवर संभाजी कागणे तर युवा संघर्ष समितीवर शिवदयाल ठाकुर यांची निवड.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/02/2023 4:29 PM

नांदेड :-  जिल्ह्यातील ता.कंधार येथील  मुख्याध्यापक संभाजी कागणे, नांदेड येथील उच्च शिक्षीत युवक शिवदयाल ठाकुर,अॅड.जयप्रकाश देऊळगावकर, सामाजिक कार्यकर्ते तथा राय टिव्ही चे संपादक संजय राक्षसे यांच्या  दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष गोपाळराव लाड,सचिव निलेश ठाकरे, कार्याध्यक्ष दशरथ रोडे, मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा वायवळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर  यांच्या उपस्थित सदरील निवडीचा कार्यक्रम पार पडला.
    पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा नांदेड च्या वतीने सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.सत्कारांच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांनी पुरोगामी पत्रकार संघ संचलित "शिक्षक हक्क चळवळ समिती" वर नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी संभाजी कागणे तर कंधार ता.अध्यक्ष पदी अॅड. जयप्रकाश देऊळगावकर, "युवा संघर्ष समिती" वर नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी शिवदयाल ठाकुर, तर पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय राक्षसे यांची निवड जाहीर करुन त्यांचा सन्मान आणि सत्कार केला. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर म्हणाले की, आमचे ऊर्जास्रोत असलेले आदरणीय विजयजी सुर्यवंशी साहेब यांनी 2017 साली पुरोगामी पत्रकार संघ नावाचं एक छोटंसं रोपटं त्यांनी लावलेलं आहे. आणि आज त्याच रोपट्याच रुपांतर मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे. तोच‌ वटवृक्ष आज आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या वृक्षाच्या फांद्याच आपण सर्वजण आहोत. आज मी आपल्या सर्वांवर जी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडावी, पत्रकार संघाला कुठलेही गालबोट लागेल असे कुणीही कृत्य करू नये असे ही ते म्हणाले.
  नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पुरोगामी पत्रकार संघ हा सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा संघ आहे. कामगार, शेतकरी, महिला व अन्य कुणावरही अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपणा सर्वांना लढावच लागणार आहे. यावेळी विरोधकांकडून आपणाला विरोधही होऊ शकतो आणि धमकी पण येऊ शकते, अशावेळी आपल्या संघाची एकजुट दाखवून आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा पुकारावा लागणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी आवाज द्या संपूर्ण पत्रकार संघ तुमच्या पाठीशी आहे,असेही ते म्हणाले. या नंतर पत्रकार संघाची पुढील वाटचाल कशी असेल यावर नांदेड जिल्हा महासचिव प्रकाश कोल्हे यांनी प्रकाश टाकला.  माहिती अधिकार समिती जिल्हा अध्यक्ष विठ्ठल घाटे, राशन दक्षता समिती जिल्हा अध्यक्ष जावेद शेख लहानकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संजय राक्षसे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व शेवटी जावेद शेख लहानकर यांनी सर्वांचे आभार मानले. उमरी येथील निर्भिड पत्रकार शेखआरिफ, सामाजिक कार्यकर्ते, अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.ह्या सर्वांच्या निवडी बद्दल नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मित्र परिवार, सामाजिक, राजकीय, व्यापारी क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या