ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दत्ता काटकर व मनोज वैद्य काका यांच्या हस्ते महाभिषेक महाआरती घेण्यात आली.


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 2/1/2023 10:04:28 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
दहिवडी /प्रतिनिधी


 नरवणे: एक गाव एक गणपती १६७ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या नरवणे गावचे ग्रामदैवत श्री गणेश. श्री गणेश जयंती निमित्त सर्वेश्वर मंदिरात दिनांक 25 जानेवारी बुधवार पहाटे 5.30 वा. यजमान श्री दत्ता भरत काटकर यांच्या हस्ते श्रींच्या वरती मनोज वैद्य काका यांच्या मंत्रोपचाराद्वारे महाभिषेक व महाआरती करण्यात आली. संध्याकाळी 6.वा .श्री गणेशाच्या 108 नामावली सहित श्रीवर दुर्वा वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर भजन झाले. गणेश स्तोत्र व गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चा गजरात श्रींच्या वरती पुष्पवृष्टी करण्यात आली. नंतर जन्मोत्सव साजरा करण्यात आला नंतर सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचा ला देण्यात आला अनेकांनी महाप्रसादासाठी योगदान दिले .संस्कार शिबिराच्या विद्यार्थ्यांनी भोजन वाटपाचे सुंदर काम केले.
या कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमिटी अध्यक्ष बाळासाहेब हणमंत काटकर, भजनी मंडळ, ग्रामस्थांनी केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संपत कुंभार, मनोहर काटकर सर यांनी केले होते.

Share

Other News