श्री शारदा भवन प्राथमिक शाळा अर्धापूर ही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी शाळा - श्री.व्यंकटेश चौधरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/01/2023 12:42 PM

नांदेड :- अर्धापूर येथे नव्यानेच स्थलांतर होवून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ही शाळा प्रयत्नशील आहे. तसेच ही शाळा विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी शाळा होय असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. ते श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा भवन प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.डी. धसवाडकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक प्र.प्रविण देशमुख, व्यंकटराव राऊत, शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.डॉ.काझी मुख्तारोद्दिन देळुबकर, राजू कल्याणकर (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ) सौ.गितांजली राऊत ताई (माता सहसचिव, शाळा व्यवस्थापन समिती ) पर्यवेक्षक डी.एस. काळे हे उपस्थित होते. 
१६ जानेवारी २०२३ पासून वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत महापुरुषांची व्यक्तिरेखा रेखाटली तसेच शेतकऱ्यांची व्यथा, पर्यावरण संरक्षण जलसंवर्धन, वृक्ष संवर्धन इत्यादींचा संदेश दिला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुरेख नियोजन व सुत्रसंचलन संस्कृतिक विभाग प्रमुख धुळगंडे एस.एस. यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.डी.शिंदे ,पाटील एम.ए., पाटील एस.डी., डी.डी.चंबलवार, शिंदे एस.एम. यांनी सहकार्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या