आठवले विनय मंदिरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात सुरु...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2022 5:32 PM


सांगली : 
सांगली शिक्षण संस्थेच्या श्री. म के.  आठवले विनय मंदिरमध्ये आजपासून वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू झाला. शालाधिक्षिका  सौ. वर्षा मिलिंद कुलकर्णी प्रमुख पाहुण्या होत्या. नानासाहेब खाडे यांनी स्वागत केले. सौ कुलकर्णी  यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करण्यात आले. सौ कुलकर्णी   यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावरती आपले कौशल्य दाखवावे,  खिलाडू वृत्ती जोपासवी अशी सूचना केली. सौ कुलकर्णी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  शारीरिक व बौद्धिक अशा दोन विभागामध्ये २ डिसेंबर पर्यंत स्पर्धा होणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले. स्नेहल  गौंडाजे यांनी सूत्रसंचालन केले. सौ नंदिनी सपकाळ यांनी आभार मानले. 
दरम्यान यावेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या