आवाहन

BREAKING NEWS

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/30/2022 6:56:21 PM

गडचिरोली, दि.30: गडचिरोली जिल्ह्यात सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या  इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना राबविण्यात येते. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेअंतर्गत आपल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून सदर विद्यार्थ्यांचा फेब्रुवारी/ मार्च 2022 मधील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयास सादर करण्यात यावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
****

Share

Other News

ताज्या बातम्या