आवाहन

BREAKING NEWS

नगरपरिषदेच्या हलगर्जेपणामुळे म्हसवड करांचे आरोग्य धोक्यात

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 9/30/2022 10:09:23 AM

.

आरटी आय न्यूज नेटवर्क 
दहिवडी : प्रतिनिधी

 म्हसवड मधील नागरिक चिंतेत 
शहरातील साथीच्या रोगावर तात्काळ उपाय योजना करा
दलित पॅंथर ची मागणी.

 सध्या म्हसवड शहरात नगरपरिषदेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात डासांची धोकादायक वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 त्यामूळे म्हसवड नगरपरिषदेच्या हद्दीत सर्वच परिसराची स्वच्छता करून गटारांची स्वच्छता करण्याची गरज बंदिस्त गटारांची उघडी गटारे बंद करून डास मारण्यासाठी ताबडतोब औषध फवारणी करावी. या उपाययोजना करून नागरीकांचे आरोग्य वाचवावे अशा प्रकारची मागणी करून दलित पँथर संघटनेकडून म्हसवड नगरपरिषदेला निवेदन करण्यात आले आहे.

यावेळी म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.
   त्यावेळी दलित पँथरचे माण तालुका अध्यक्ष मा.प्रमोद लोखंडे, म्हसवड शहर अध्यक्ष भिमराव सरतापे, सामाजिक कार्यकर्ते शंकर लोखंडे, युवा कार्यकर्ते अमोल लोखंडे, नटेश्वर देवकुळे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या