ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

हर घर तिरंगा मोहीमेत मनपाचा गलथान कारभार , महापौरांनी खुलासा करावा: नगरसेविका स्वाती शिंदे


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 8/14/2022 9:57:25 AM


   15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होणार आहे. दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी तीन दिवस भारताचा राष्ट्रध्वज असणारा तिरंगा ध्वज प्रत्येक भारतीयाने घराघरावर लावावा व "हर घर तिरंगा" या पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे. 

सांगली महानगरपालिकेने सांगली महापालिका क्षेत्रात घरोघरी महानगरपालिका तिरंगा ध्वज मोफत देईल असे जाहीर केले होते. लोकांना झेंडे देण्यासाठी एक लाख तिरंगा झेंड्यांची ऑर्डर देखील कंत्राटदारास दिली होती परंतु सत्ताधारी व प्रशासनाने या तिरंगा झेंड्याच्या निर्मितीच्या कामावर लक्ष ठेवले नाही, हर घर तिरंगा ही मोहीम गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे 45 हजार तिरंगा झेंडे चुकीचे व खराब महानगरपालिकेला मिळाले केवळ 35000 झेंडे लोकांपर्यंत पोहोचविण्यात महानगर पालिकेला यश आले आहे. अनेक नागरिक नगरसेवकांना फोन करून तिरंगा ध्वजाची मागणी करीत आहेत. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याच्या मानसिकतेत असताना महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे त्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. तिरंगा ध्वज हा राष्ट्रध्वज असल्याने त्याची लांबी, रुंदी व रंगाचे प्रमाण यासाठी नियम आहेत. त्यामुळे महानगरपालिकेनेच हे झेंडे घरोघरी पोहोचविणे महानगरपालिकेची जबाबदारी होती. ही जबाबदारी सुद्धा महानगरपालिका पार पाडू शकलेली नाही असा आरोप नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी केला आहे. नवीन आयुक्त सुनील पवार व सत्ताधारी यांनी तातडीने नियोजन करावे. नवनवीन वितरकांशी, झेंडा निर्माण करणाऱ्या कारखानदारांशी संपर्क करावा आणि उद्याच्या दिवसभरात तरी जास्तीत जास्त नागरिकांच्या पर्यंत झेंडे पोहोचवावेत अशी मागणी देखील ॲड. स्वाती शिंदे यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या या  गलथान कारभाराबाबत महापौरांनी खुलासा करावा अशी मागणी देखील स्वाती शिंदे यांनी केली आहे.

Share

Other News