ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*देसाईगंज येथे आदरणीय मुख्यमंत्रीच्या समर्थनात अन्न-पाणी त्याग*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 6/26/2022 10:44:25 PM

महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे अडीच वर्ष पूर्ण करून राज्यात कायदा सुवेवस्था व शांतता व्यवस्थित राज्य चालवत असताना अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला व काही विध्वन्षक वृत्तीच्या लोकांनी सत्ता उलटा पालट जोरदार प्रयत्न चालविले आहे त्याचा विरोध व देशात प्रथम क्रमांकाचे सर्वे रिपोर्ट मध्ये आलेले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवराव ठाकरे हेच मुख्यमंत्री असावे अशे देसाईगंज शहर जनते कडून जाहीर पाठींबा देण्यात येत आहे त्याचे अवचीत्य साधून सामजिक कार्यकर्ते अमीर खान सुभान खान पठाण दिनांक २६/०६/२०२२ ते राज्यातल्या घडामोडी संपे पर्यंत जनतेच्या पाठींब्याने फवारा चौक च्या व्यासपीठावर अन्न पाणी त्याग करून बसले आहे. त्यांच्या जवळ असलेल्या पाठींबा पुस्तक मध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाला पाठविणाऱ्या पुस्तका मध्ये शेकडो नागरिक स्वाक्षऱ्या करून पाठींबा दर्शवित आहे. राज्यात घडामोडी नंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहर जनतेच्या वतीने लवकरात लवकर घडामोडी संपवून पुन्हा राज्य व्यवस्थित आदरणीय उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात राज्य सरकार स्थापन राहावे अशी नागरिकांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. विजय सुरंकर, नसीर जुम्मन शेख, सागर बनसोड, साहिल वझाडे, अक्षय कुंदनवार, ज्ञानेश्वर कवासे, तुमानेजी, तनवीर अली सैय्यद, चांदेवार अशे शेकडो लोकांनी सहभाग घेतला.

Share

Other News