कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2022 3:12 PM


समाजाचा उपेक्षितांना बळ देणारे,सामाजिक क्रांतीचे अग्रणी,आरक्षणाचे जनक व आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४८ वी जयंती कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने आज कुपवाडमध्ये साजरी करण्यात आली.

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे,लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला कुपवाड MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.अविनाश पाटील व माजी दर्गा सरपंच पै.राजू मुजावर,हाजी समीर जमादार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,उपाध्यक्ष प्रवीण कोकरे,कार्याध्यक्ष अनिल कवठेकर,संचालक राजेंद्र पवार,महावीर खोत,अमर दीडवळ,समीर मुजावर,प्रकाश पाटील,श्रीकृष्ण कोकरे,अशोक रासकर,दिलीप धोतरे उपस्थित होते.. 

Share

Other News

ताज्या बातम्या