24×7 जनतेसाठी वाहून घेतलेल्या "आयुष" सेवाभावी संस्थेचा आज 10 वा वर्धापनदिन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/05/2022 10:23 AM


आज #आयुष_सेवाभावी_संस्थेचा_10_वा_वर्धापनदिन  त्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊ आपली संस्था नेमकी काय काय करते

आयुष्य खुप लहान आहे,प्रेमाने माणूस जोडत रहा.
धन-दौलत सोबत येणार नाही,फक्त माणुसकी जपत रहा 
 माणुसकी तोच जपतो जो अडचणीच्या काळात मदतीला येतो
#आयुष_सेवाभावी_संस्था अडचणीच्या काळात माणुसकी ची हात देणारी माणस.
चांगल्या काळात सगळेच येतात,जो दुःखात सोबत उभा राहतो तोच माणुस. अनेकांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न जो सर्व जाती धर्माच्या समूहातून होतो
तो समूह म्हणजे आयुष सेवाभावी संस्था

थोडक्यात आपली कामे
#मातीविरहित_बाग
 घरातील कचरा व्यवस्थापन, कँपोस्ट सेंद्रीय खत घरच्याघरी निर्मिती, घरातील बागकाम येणाऱ्या अडचणींनवर मार्गदर्शन तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण संवर्धन

#मानसिकस्वास्थ्य_हेल्पलाईन
 नैराश्य,एकटेपणा,आत्महत्या विचार किंवा प्रयत्न यासाठी समुपदेशन
#सर्पमित्र
 सापानं बद्दल जागृती बचाव व  नैसर्गिक अधिवासात मुक्ततता
तसेच  बिबट्या गवारेडा रेस्क्यू मध्ये सहभाग

#रुग्णसाह्य टीम

घरात पडून असलेल्या रुग्णाचे जीवन सुसाह्य व्हावे या करिता पाण्याच्या व हवेच्या  गाद्या वोकर कुबड्या खुर्च्या इत्यादींची मदत

 याच टीमच्या माध्यमातून रुग्णांना हायटेक कृत्रिम अवयव श्रवणयंत्र मोफत देण्यात येतात

कोरोना मध्ये  रुग्णालयात हायटेक बेड पुरवण्यात आले

ऑक्सिजन पोर्टेबल मशीन विना शुल्क देण्यात आले

कोरोनाची खबरदारी म्हणून मिथिलीन ब्लु हे औषध  नागरिकांना मोठ्या प्रमाणात  मोफत  देण्यात आले

#आपत्कालीन टीम
 कोणत्याही संकटात जिल्ह्यात तसेच जिल्ह्या बाहेर तात्काळ मदत

रस्ते अपघात, नदी विहिरी तलाव  मधील रेस्क्यू

विषप्राशन केलेल्या रूग्णांना दवाखान्यात वेळेत पोहचवणे

फास घेलेल्या रूग्णांना देखील वेळेत पोहोचून त्यांना देखील जीवनदान देण्यात आलेले आहे

नदी विहिरी तलावात बुडणाऱ्याना वाचवणं दुर्दैवाने उशीर झाल्यास त्यांचे  मृतदेह शोधणे

 खून झालेले मृतदेह शेत जंगल पाण्यातून खोल विहिरीतून अलगद काढणं

बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

कोरोना महापूर किंवा इतर प्रसंगी गर्दी नियंत्रण

#ब्लड हेल्पलाईन
 
निघेटीव्हीरक्तगटासाठी व SDP साठी महाराष्ट्र्रात सर्वात मोठी टीम
 
थायलेसेमीया जागृती व मदत मनापासून करणारी टीम

डेंग्यू  जागृती तसेच SDP साठी 300शे SDP दाते सदैव तयार असतात
 
जेव्हा  कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया  उपचार रकतासाठी थांबतात तेव्हा धावणारी टीम

नवजात बालक,गरोदर स्त्रीया लहान मुलं  अपघात ग्रस्त रुग्णांसाठी अहोरात्र  रक्तदान करायला तयार असणारी टीम

#अवयवदान

नेत्रदान, त्वचादन, देहदान याबाबत जागृती करून
नेत्रदान बाबतीत काम चांगल्या प्रकारे चालू आहे

#रुग्णवाहिका
 अपघातग्रसतांसाठी 27x7 रुग्णवाहिका मोफत पुरवणारी एकमेव संस्था
तसेच  
एकदम अत्यवस्थ रुग्णांसाठी  कार्डियाक व व्हेंटिलेटरवर सहित अत्यल्प किंमतीत

#स्कुलहेल्प

गरजू  मुलांना शाळेचं किट तसेच वह्यांचे वाटप
तसेच शाळेमध्ये वॉल पेटींग ईलर्निंगसाठी  स्मार्ट टीव्ही संगणक आशा प्रकारची मदत
आपल्या या संस्थेला अजून मोठे होण्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद  नक्कीच द्या

माहिती संकलक
 गणेश आनंदे

Share

Other News

ताज्या बातम्या