लोकहिताचे प्रश्न घेऊन येणारी महापालिका निवडणुक पुर्ण ताकतीने लढणार : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/05/2022 8:02 AM


सांगली दि १३,
   सांगली मिरज आणि कुपवाड शहरांचा विकास आराखडा हा लोकहीताचा नसून नागरिकांच्या मुळावर उठणारा आहे. शहराचा विकास होण्या ऐवजी शहारे बकाल होत आहेत. नागरी सुविधाचाही मोठा आभाव या विकास आराखड्यात आहेत. सत्ताधाऱ्यांनी धंनदाडग्याचे हित जोपासात गोरगरीबांच्या मिळकती आजही कायदेशीर होत नसतील तर हा विकास आराखडा लोकांच्या हिताची नाही त्यात दुरुस्ती केली जाईल. असे अनेक लोकहीताचे प्रश्न घेऊन येणारी महापालिका शिवसेना पूर्ण ताकदिने लढवणार आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहरांतील गुंठेवारी भागातील प्रभागात येत्या २० तारखे नंतर बुध कमिट्या बांधणी करून बैठक आयोजित करून मार्गदर्शन करणार....

येत्या महानगर पालिकेची निवडणूक तयारी साठी आत्ता पासून शिवसेना पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी तयारी करत असून येत्या महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार निवडून जाण्यासाठी त्यांना पक्षाची व गुंठेवारी मतदार बंधुची मोठ अधिक सक्षम करून येथील भागास न्याय देण्यासाठी महापालिकेत सक्षम नगरसेवकची टीम तयार करणार आहोत.

महापालिकेत गुंठेवारी जनतेची ससेहोलपट सुरु आहे. आरक्षनाने व पूरपट्ट्याने बाधित असलेल्या हाजरो घरांना न्याय देण्याची भूमिका आमचे नगरसेवक घेतील  मुबंई, पुणे,संभाजीनगर, नांदेड नागपूर सारख्या मोठामोठ्या शहरात नदी काठावर ब्लु झोन मध्ये लाखो टोलेजन्ग वसाहती असताना आपल्या महापालिकेत 2007 साली ठराव करून ब्लु झोन म्हणजे पूर पट्ट्यातील रहिवाश्यांना मात्र वेठीस धरले गेले आहे त्यांना प्रमाणपत्र व रेखांकन मंजूर करून दिले जातं नाही शिवाय शहरांतील नागरिकांचे अनेक प्रश्न वर्षेनवर्षे खितपत पडले आहेत. अनेक सत्ताधाऱ्यांनी जी जनतेला आश्वासने दिली आहेत त्याची पूर्तता करण्यास सत्ताधारी कमी पडले आहेत. तीच आश्वासने निवडून गेल्यावर नागरिकांच्या प्रश्नाला सत्ताधारी बगल देऊन राजकारण करण्यात व्यस्त असतात हे चित्र वर्षेनवर्षे जनता पहात आली आहे त्यामुळे बदल व्हावा हा ध्यास घेऊन वाटचाल आता आम्ही करत आहोत.

सांगली महापालिका क्षेत्रात यापुढे शिवसेना एका नवीन ध्येय दृष्टी घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करेल. शहरांचा जो विकास आराखडा  3 एप्रिल 2015 ला अंतिम मंजूर झाला आहे त्यामध्ये दलाल कंपनीला टेंडर देण्यात आले त्यामध्ये फक्त विकास आराखडा तयार झाला नाही तर अनेक धनदाडग्यांच्या हे दलाल कंपनी ताटातले मांजर झाले अनेकांच्या मालमत्ता वर टाच आणली गेली अनेकांच्या मिळकतीत सूट दिली अनेकांच्या मिळकती कायदेशीर असताना त्यांच्या रहात्या घरावर आरक्षणे टाकली गेली त्या काळी असणारे आमदार खासदार या जिल्ह्याचे मंत्री यांनी मूग गिळून यांना पुढची वाट मोकळी करून देऊन विकास आराखाड्याची वाट लावली आहे ती शहरांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही जनतेला न्याय देण्याची भूमिका पुढील काळात शिवसेना गुंठेवारी विकास समिती घेणार आहे.

या राज्यातील व देशातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले पाहिजे अशी शहरे स्वच्छ सुंदर व लोकांभीमुक सोयी सुविधानी सज्ज अशी शहरे खऱ्या अर्थाने बनवण्यासाठी आता यापुढे पाऊले उचली जातील त्यातून नागरिकांचे जीवन सुखी समृद्ध होणार आहे..

शाळाअध्यावत, व्यापार वृद्दी,महापालिकेची सर्व विभागात नागरिकांची दखल घेतली जावी छोट्या छोट्या व्यावसायिकाना कायम स्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासह अनेक लोकाहिताचे मुद्दे घेऊन जनते समोर जाणार आहोत.

Share

Other News

ताज्या बातम्या