ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अनुसूचित जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 5/13/2022 9:38:05 PM



रोहित बोंबार्डे
तुमसर भंडारा, दि. 13 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी शासनाने 31 मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व 16 मार्च 2016 चे शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख रुपये पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना परदेशात एम. बी. ए. पदव्युत्तर, वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर, बी. टेक इंजिनिअरींग पदवी व पदव्युत्तर, विज्ञान व कृषी पदवी व पदव्युत्तर आणि इतर विषयाचे अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भंडारा या कार्यालयाशी साधावा तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.

Share

Other News