कुपवाड ग्रामपंचायत कालावधीपासून जुनी पाईपलाईन बदलली नव्हती. त्यामुळे शहरांमधील उल्हासनगर मुख्य बाजारपेठेतील पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने येत होता . नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे सदरची पाईपलाइन बदलून मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. यासाठी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून त्यांना लेखी पत्राद्वारे सदरचे काम प्रस्तावित करण्यासाठी सूचना दिल्या . नऊशे मीटर लांबीची पाइपलाइन कामाची आजपासून सुरूवात झाली या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक व्यापारी व मंगळवार पेठ मधील महिला व भाजी विक्रेते यांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे विजय खोत म्हणाले,गेल्या कित्येक वर्षापासुन या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता यासाठी भागातील विजय खोत व नागरिकांनी नगरसेवक गजानन मगदुम यांचेकडे पाठपुरावा करुन सदरच्या कामाची सुरवात केली. याबद्दल नागरिकांच्या वतीने नगरसेवक गजानन मगदुम यांचे आभार मानले .पाईप लाईनचे काम पुर्ण झालेनंतर या भागामध्ये पिण्याची पाणि समस्या मार्गी लागणार आहे.
यावेळी नगरसेवक गजानन मगदुम, विजयदादा खोत ,रफिक मुजावर, महादेव बेळे, अरून तात्या रुपनर ,मोहन जगताप, बाळु दिक्षित, जिनगोंडा पाटील ,सुखदेव काळे ,विष्णु दुधाळ, अभिजित कोष्टी, प्रतिक पाटील, महेश भोसेकर ,हेमंत माळी ,राजु मुजावर, महेंद्र कडते , चंद्रकांत खोत व भागतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.