ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार व ओबीसीना मोठा दिलासा : प्रा. हरी नरके*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 1/19/2022 7:26:01 PM

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार व ओबीसीना मोठा दिलासा : प्रा. हरी नरके
चंद्रपूर:-
आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी व राज्य सरकार यांना मोठा दिलासा देणारा निकाल दिला.  काल ओबीसी आरक्षणाविना निवडणुका झाल्या त्याचे निकाल आज आले. येत्या फेब्रुवारीत बऱ्याच निवडणूका होणार आहेत.निदान तिथेतरी ओबीसी आरक्षण राहावे यासाठी एक तोडगा राज्याने सुचवला होता तो न्यायालयाने स्वीकारला.  राज्याकडे उपलब्ध असलेली ग्रामीण विकास खात्याच्या विबिध अभ्यासातली आकडेवारी, नमुना पाहण्या व Secc 2011 चा (जात वगळून मिळालेला उर्वरित ) डेटा यांच्या आधारे तात्पुरता दिलासा देता येतो हे न्यायालयाने मान्य केले. हा राज्य सरकारचा मोठा विजय आहे.
महाविकास आघाडी सरकारचे अभिनन्दन!
 राज्य मागास वर्ग आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार सहानुभूतीचा व सामाजिक न्यायाचा दृष्टीकोन स्वीकारून ओबीसी आरक्षण तात्पुरते वाचवू शकते ही मोठी गोष्ट आहे: 

Share

Other News