संविधानामुळेच मुलभूत हक्क मिळाले:पोलीस निरीक्षक-नितीन चिंचोळकर

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 28/11/2021 2:08 PM


( संविधाना "उद्देश पत्रिका" भेट देण्याचा भीम आर्मीचा स्तुतीजन्य उपक्रम )


रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर:भारतीयांची आन-बाण-शान म्हणजे भारताचे संविधान होय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून सर्व थोर-पुरुषांच्या व भारतीयांच्या स्वप्नांना साकार केले.या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराने स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय ही मूल्ये संविधानातुन आपल्याला प्रदान केली.विविधते मधून एकता निर्माण करणारा एकमेव देश म्हणजे भारत होय.संविधानामुळे मूलभूत हक्क मिळाले आणि आणि आपण दाही दिशा पादाक्रांत केल्या.यास्तव आज समाजात, देशांत"जातीय सलोखा व शांतता"टिकविणे हे प्रत्येक भारतीयांचे नैतिक कर्तव्य आहे.प्रत्येक भारतीयांच्या घरी संविधान असणे व त्याचे वाचन करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी केले.ते भीम आर्मी च्या वतीने "भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका" संविधान दिनानिमित्त भेट स्वीकारल्यानंतर युवकांशी संवाद साधत असतांना प्रतिपादन केले.यावेळी समाज प्रबोधक राहुल डोंगरे सर,सहाय्य पोलीस निरीक्षक अमर धंदर प्रामुख्याने उपस्थित होते.भीम आर्मी सामाजिक संघटना,भारत एकता मिशन तुमसर कडून संविधान दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन तुमसरला "संविधानाचा सरनामा"भेट देतांना-भीम आर्मीचे तुमसर अध्यक्ष रजनीश बन्सोड,अभिजित रामटेके, कुणाल लेंडे, योगेश उके,राजा बोंबार्डे,अनिकेत डोंगरे,प्रोहित मेश्राम,सतीश रंगारी,पंकेश बोंबार्डे,संघर्ष मेश्राम, ऋत्विक रंगारी,धर्मपाल मेश्राम, सुभोद नागदेवे, मंदिप सुखदेवे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या