ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

** गुंठेवारी प्रमाणपत्र शिबिरास शिवसेना गुंठेवारी विकास समिती प्रमुख चंदनदादा चव्हाण व पदाधिकाऱ्यांची भेट...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 4:01:55 PM


     शिवसेनेने गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी शिबिर आयोजित करावे या मागणी नुसार पालिकेच्या आज शिबीरास राज्याचे प्रमुख शिवसेनेचे गुंठेवारी विकास समितीचे मा चंदनदादा चव्हाण व पदाधिकारी यांनी आज भेट दिली.

    या राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यानी गुंठेवारी नियमितीकरण कायदा 2001 चा पुढे 31 डिसेंबर 2020 अखेर वाढवला असून त्याप्रमाणे मा आयुक्तानी शिबीराचे आयोजन करून प्रमाणपत्रे देण्यात यावी अशी मागणी गेल्या महिन्यात केली होती. त्याप्रमाणे शिबीर नगर सहा संचालक श्री झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे . नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महापालिकेने शिवसेनेच्या मागणी नुसार शिबिराचे आयोजन केल्या बद्दल शिवसेनेच्या वतीने आभार मानले, तसेच शुभेच्छा ही देण्यात आल्या.
      याप्रसंगी राज्य उपप्रमुख बाबासाहेब सपकाळ, शिवसेना गुंठेवारी चे जिल्हाप्रमुख रविराज कुकडे, कुपवाड शहर प्रमुख सुरेश साखळकर, मिरजेचे विजय बल्लारी तसेच नगररचना अधिकारी श्री मकानंदार ,काकड़े , मोरे आदी उपस्थित होते .

Share

Other News