ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे दि.२७ व २८ रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/25/2021 10:06:45 PM

गडचिरोली, (जिमाका) दि.25 :  नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांचे बुधवार, दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ता.आरमोरी जि. गडचिरोली येथे आगमन. सकाळी आरमोरी तालुक्यातील विविध गावांना भेटी व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी गडचिरोली येथे आगमन व आदिवासी विकास विभाग कामकाज आढावा बैठकीस शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजनास उपस्थिती. दुपारी शासकीय विश्रामगृह येथून 'सर्च' चातगांव कडे प्रयाण. आदिवासी सेवा दवाखान्यास भेट. सायं. सर्च येथून शासकीय विश्रामगृह गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.
गुरुवार, दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी धानोरा तालुक्यातील विविध गावांना भेटी व कार्यक्रमांना उपस्थिती. दुपारी ता. धानोरा येथून शासकीय विश्रामगृह, गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.
****

Share

Other News