ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

* शाळा, महाविध्यालयातील वाढती छेडछाड रोखण्यासाठी "निर्भया पथक" नेमण्याची मिरज शहर सुधार समितीची मागणी..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/25/2021 4:32:21 PM


##  शाळा, महाविद्यालये सुरू होताच छेडछाडीच्या प्रकारात वाढ...

    कोरोनाच्या प्रादुभार्व कमी झाल्याने सर्व शाळा, हायस्कूल, महाविद्यालये खुले होताच विद्यार्थीनींंची छेडछाडीच्या प्रकारात वाढत होत असून पोलीस यंत्रणेने पुन्हा निर्भया पथकाची स्थापना करण्याची मागणी मिरज शहर सुधार समितीने उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, तब्बल दिड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शिक्षण संस्था सुरू झाल्याने सर्वच शाळा, महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्यांची उपस्थिती लक्षणीय आहे.  शाळा, हायस्कूल, महाविद्यालये सुटल्यानंतर काही टवाळखोर विध्यार्थ्यांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थीनींना अडवून त्यांची छेडछाड काढण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थीनी त्रस्त आहेत.  वाद होऊन आपल्याच पाल्याचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या भितीने पालकही छेडछाडीबाबत पोलिसात तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे टवाळखोरांचे कृत्य करण्याचे धाडस वाढत आहे.  अनेक वेळा छेडछाडीच्या प्रकारावरून तरूणांच्या दोन गटात संघर्ष होण्याचे प्रकारही घडत आहेत. याबाबत पोलिसात तक्रारी होत असल्याने पोलीसही अनभिज्ञ आहे. कोरोनापूर्वी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, दिड वर्षे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने पथकाचे काम मर्यादित होते. म्हणून मिरज शहरातील महाविद्यालये व हायस्कूल परिसरात निर्भया पथकाची स्थाना करून पोलीस गस्त  वाढविण्याची मागणी समितीने केली आहे.
  यावेळी सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, बाळासाहेब पाटील, संतोष माने, मुस्तफा बुजरूक, सौ. गीतांजली पाटील, जहीर मुजावर, जावेद शरिकमसलत, राजू दयाळ, अक्षय वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.

Share

Other News