ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गोवंश तस्करांवर कठोर कारवाई करा अन्यथा मोठे आंदोलन - आ. डॉ देवराव होळी


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/24/2021 10:34:12 PMगो-रक्षक प्रफुल बिजवे व शर्मा  यांचेवर  व्याहाड (बु.)येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला तीव्र निषेध

रुग्णालयात जावून घेतली जखमी गोरक्षकांची भेट

हल्ला करणाऱ्या गोवंश तस्करांना  तातडीने अटक करा

हल्लेखोरांना वाचविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम

दिनांक २३ऑक्टोंबर २०२१ गडचिरोली

 गडचिरोली जिल्ह्यात गोवंश तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्ह्यातून गोवंशाची  मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. या तस्करीला प्रशासनाने तातडीने आळा घालावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केली  असून  गोवंश तस्करांवर कार्यवाही न केल्यास  जिल्हयात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गडचिरोली येथील गोरक्षक विजय शृंगारपवार, प्रफुल बीजवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोली येथून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन गडचिरोलीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र त्याचा सातत्याने पाठलाग करून अखेर व्याहाड बू. जिल्हा चंद्रपूर  येथे त्यांना पकडण्यात आले.  परंतू व्याहाड बू हे गोवंश तस्करीचे मोठे केंद्र झाले असुन तेथे तस्करीचे मोठे हब आहे. त्यामुळे  तस्करांना पकडण्याचा प्रयत्न करताच  ३०-४० संख्येत एकत्र जमलेल्या  मुस्लिम गो-तस्करांनी  प्रफुल बिजवे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अचानक  लोखंडी रॉड, गुप्ती व चापर च्या सहाय्याने  प्राणघातक हल्ला केला.  हल्ल्यामध्ये  प्रफुल बिजवे व  शर्मा गंभीररीत्या जखमी झाले. असून  त्यांचेवर सावली येथे प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथिल सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आमदार डॉ देवराव होळी यांनी रुग्णालयात जावून त्यांची आस्थेने विचारपूस केली व त्यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा  तीव्र निषेध करीत  हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गोवंश तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले असून हे कोणाच्या आशीर्वादाने सूरू आहे तेही तपासण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गोवंश तस्करांना तसेच हल्लेखोरांना वाचविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Share

Other News