ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कर्मवीर भाऊराव पाटील गृहनिर्माण सॊसायटीने सोसायटीच्या नागरी प्रश्नांसाठी स्थापन केली "संघर्ष समिति"


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/22/2021 2:46:34 PM


     *कर्मवीर भाऊराव पाटील गृहनिर्माण सोसायटी,कुपवाड मधील सर्व सभासद,रहिवासी यांनी आपल्या सोसायटी परिसरातील उद्भवणाऱ्या समस्या,अडचणी,नागरी प्रश्नांसाठी,प्रसंगी प्रशासना विरोधात संघर्ष करण्यासाठी एकत्रित येऊन आज "संघर्ष समिती" या नावाने संघटनेचा शुभारंभ केला.व रहिवाशी सभासद,नागरिक यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अरिहंत रेसिडेन्सीमध्ये उभारलेल्या रहिवासी "जनसंपर्क" कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आमच्या शुभेच्छा,पाठिंबा नेहमी तुमच्यासोबत आहे..*

*कर्मवीर भाऊराव पाटील गृहनिर्माण सोसायटीच्या"संघर्ष समिती"अध्यक्षपदी मा.डॉ. राजेंद्र शितोळे,उपाध्यक्ष अर्जुन लोहार,सचिव प्रविण रूपनर,सहसचिव अभिजीत कोल्हापुरे व सर्व संचालक यांचा सत्कार कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.*

*यावेळी अध्यक्ष सनी धोतरे,कार्याध्यक्ष अनिल कवठेकर,संचालक समीर मुजावर,नंदकुमार वायचळ,अविनाश कांबळे,अनिल गडदे,मारुती रुपनर,बनसोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी,रहिवासी सभासद,महिला उपस्थित होते..*

Share

Other News