ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली माथाडी मंडळाच्या गलथान कारभाराच्या विरोधात हमाल पंचायतीची निर्दशने..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/22/2021 8:42:28 AM


     सांगली माथाडी मंडळाच्या गलथान कारभारा विरोधात आणि मंडळा कडील प्रलंबित कामा बाबत माथाडी मंडळाच्या वसंत मार्केट यार्ड सांगली , कार्यालया समोर जोरदार निदर्शने करुन मंडळाचे अध्यक्ष मा.अनिल गुरव यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
     या आंदोलनाचे नेतृत्व सांगली जिल्हा हमाल पंचायतचे जनरल सेक्रेटरी विकास मगदुम,बाजार समितीचे धडाकेबाज संचालक  मा.बाळासाहेब बंडगर,उपाध्यक्ष रामचंद्र बंडगर,एम.आय.डी.सी. हमाल पंचायत प्रमुख श्री.शिरमा बंडगर, तोलाईदार सभेचे उपाध्यक्ष श्री.आदगोंडा गौंडाजे यांनी केले.

Share

Other News