ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

भगुर नगरपरिषदेने व कॅन्टोन्मेंट बोर्डने पावसापूर्वी नैसर्गिक नाले व गटारे साफ करावे :- मा उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 6/10/2021 7:39:16 PM

भगुर नगरपरिषदेने व कॅन्टोन्मेंट बोर्डने पावसापूर्वी नैसर्गिक नाले व गटारे साफ करावे :- मा उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख 

पावसापूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगरपरिषदेने नैसर्गिक नाल्यावरील असलेले अतिक्रमणे काढून नैसर्गिक नाले व गटारी साफ कराव्या अशी मागणी मा. उपनगराध्यक्ष श्री  काकासाहेब देशमुख व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे    

मागच्या वर्षी पावसामुळे विजयनगर परिसरातील व भगूर शहरामध्ये अनेक घरांमध्ये व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक गरीब नागरिकांच्या घराचे नुकसान झाले व शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कारण इंग्रजांच्या काळापासून शंभर वर्षांपूर्वी पासून बांधण्यात आलेल्या मोरया व नैसर्गिक नाल्यावर स्थानिक रहिवाशांनी व्यापाऱ्यांनी व बिल्डरने अतिक्रमण  केल्यामुळे आर्मी व ईदगाह  परिसरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाह मध्ये भगूर बसस्टॉप परिसर  तसेच नानेगाव रोड  शेळकेमळा परिसरातून विजयनगर परिसरात भगूर समतावाडी राजवाडा परिसरात व भिलाटी परिसरात अतिक्रमणे झाल्यामुळे  पूर्वी नाले मोकळी असल्यामुळे पावसाच्या पाणी व्यवस्थित वाहून जात होते परंतु आता पावसाच्या प्रवाहाला अडथळ्यामुळे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे  सदरील पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचून राहते त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले असतात व  गरीब जनतेच्या घरामध्ये घुसते त्यामुळे अनेक गरीब नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान  होते तसेच अनेक शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते  कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगरपरिषदेने पावसाच्या पूर्वीच नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे काढून सदरील नाल्या व गटारी साफ कराव्यात जेणेकरून पावसाच्या  प्रवाहचे पाणी इतर ठिकाणी पसरणार नाही नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही तरी पावसाच्या पूर्वीच नैसर्गिक नाले वरील अतिक्रमणे काढून व गटारी साफ करावेत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख आनंद ताजनपुरे शाम ढगे संजय जाधव आरडी जाधव गणेश करंजकर अशोक मोजाड प्रशांत कापसे कैलास गवळी शशिकांत देशमुख हिरूशेठ लोया बाळासाहेब कुलथे निलेश हासे शिवाजी गायकवाड अनिल कासार प्रताप गायकवाड संजय काळे जनार्दन जाधव यांनी केली आहे

Share

Other News