ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा ही संघटन या उपक्रमा अंतर्गत वृद्धाश्रमात छत्री वाटप.


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 6/10/2021 7:00:29 PM

नांदेड:शहरात संध्याछाया वृद्धाश्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसा निमित्ताने सेवा ही संघटन या उपक्रमा अंतर्गत भाजपा नांदेड महानगरच्या वतीने जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अँड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना तसेच मनपा सफाई कामगारना पावसाळ्यात उपयुक्त छत्रीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . 
संध्याछाया वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रविण साले ,सरचिटणीस,दिलीप ठाकूर, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, बागड्या यादव, जिल्हा प्रवक्ता धीरज स्वामी, चिटणीस मनोज जाधव, अभिलाष नाईक, मंडळाध्यक्ष सूर्यकांत कदम, संदिप कहाळे, दिव्यांग आघाडीचे प्रशांत पळसकर, युवामोर्चाचे संदिप पावडे, सोशल मिडिया प्रमुख राज यादव, सरेश शर्मा, विजय अटकूरकर,कामाजी सरोदे,अरुण काबरा,गोपाल कोरगे आदींसह वृद्धाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली.धीरज स्वामी,अभिलाष नाईक यांची याप्रसंगी समयोचित भाषणे झाली.अध्यक्षीय समारोप करतांना प्रविण साले यांनी दिलीप ठाकूर यांच्या सततच्या जनसेवा उपक्रमाचे कौतूक केले व चंद्रकांत दादा पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचलन धीरज स्वामी यांनी तर आभार व्यवस्थापक वाघमारे यांनी मानले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिलीप ठाकूर यांनी आठवणीने वृद्धांसाठी छत्र्यांची व्यवस्था केल्यामुळे आश्रमातील वृद्धांनी आनंद व्यक्त केला.

Share

Other News