ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महात्मा फुले जणआरोग्य योजनेचे अधिकारी व एन.डी.एम.जे संघटनेची बैठक संपन्न


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 6/10/2021 4:58:18 PM

जिल्हा समन्वयकांच्या पुढे वैभव गीतेंनी तालुका समन्वयकायाच्या अक्षम्य चुकांचा तक्रारींचा पाढा वाचला

दोषींवर कठोर कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांना पाठवणार...डॉ.दीपक वाघमारे (जिल्हा समन्वयक) कोरोना covid-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य खात्यावरील ताण वाढला आहे हे जरी सत्य असेल तरी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये तालुका समन्वयक व डॉक्टर आरोग्य मित्र हे मिळून भ्रष्टाचार करत आहेत अशी तक्रार नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टाइस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.चौकशीकामी अकलूज येथे जिल्हा समन्वयक डॉक्टर दिपक वाघमारे डॉक्टर सुजित हालीघोंगडे हे आले असता तक्रारदार वैभव गिते यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली.या चर्चेत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत त्या अशा की 
1)तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान बालकांना फटका बसू नये म्हणून नवजात शिशु व लहान बालकांचे कोविड सेंटर सुरू करावे.
2) अकलूज क्रिटिकल केअर येथील मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये सर्वच आजारांवर महात्मा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करावेत.
3) मार्च 2020 ते जून 2021 पर्यंत महात्मा जोतिबा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या रुग्णांकडे व त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करावी अंगीकृत रुग्णालयांनी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतले असल्यास त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी.

4) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अंगीकृत रुग्णालयांनी सुद्धा बेड शिल्लक नाही अशी उडवा-उडवीची उत्तरे रुग्णांच्या नातेवाईकांना दिली आहेत शासनाने 80 टक्के रुग्ण महात्मा फुले योजनेतून व 20 टक्के रुग्ण इतर असा फॉर्म्युला केला होता याचे पालन केले आहे का?याबाबत तालुका समन्वयकांनी जिल्हा समन्वयकांना अहवाल पाठवला आहे का अहवाल पाठवला नसल्यास याची कारणे काय आहेत हे पाहून दोषी तालुका समन्वयकावर कारवाई करण्यात यावी.
5) रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याबरोबर डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट ने रुग्णांना व नातेवाईकांना योजनेची परिपूर्ण माहिती द्यावी.
6) योजनेत बसवण्याची,आरोग्य मित्र,डॉक्टर,रुग्णांचे नातेवाईक यांची सर्व चर्चा सर्व प्रक्रिया सी.सी.टीव्ही अंतर्गत करावी त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करावे.
7) भ्रष्टाचार करणाऱ्या तालुका समन्वयक अखिल मुजावर यास बडतर्फ करावे.
8)इनामदार हॉस्पिटल अकलूज,राणे हॉस्पिटल अकलूज,अकलाई हॉस्पिटल अकलूज या हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जणआरोग्य योजना सुरू करावी.
9) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत योजनेअंतर्गत किती रुग्ण ऍडमिट केले होते व किती रुग्ण योजनेव्यतिरिक्त घेतले होते याची चौकशी करून संपूर्ण माहिती मिळावी .अन्यथा 14 जून रोजी प्रांत कार्यालय अकलूज येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.सर्व मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात येईल असे आश्वासन जिल्हा समन्वयक डॉ.दीपक वाघमारे यांनी दिले.यावेळी चार तालुक्यांचे प्रमुख नागेश बनसोडे,डॉ.सुजित हालीघोंगडे एन.डी.एम.जे चे तालुक्याचे नेते रवी झेंडे,प्रणव भागवत,प्रबुद्ध गायकवाड उपस्थित होते.

Share

Other News