पारबताबाई विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 27/02/2021 3:31 PM

कोरची:-

         येथील पारबताबाई विद्यालय कोरची येथे राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यानां एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्यापक एस एस कराडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरकेएसके समुपदेशक मनीषा साखरकर होते.
        सदर कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यानां आरोग्य विषयक महिती ,किशोरवयीन मुला-मुलींचे आहारविषयक महिती देतांना आहारात कोणते घटक आवश्यक आहे व त्यापासून मिळणारे घटका चे फायदे  व शासनाकडून मिळणाऱ्या पोषण आहारा संबंधी माहिती दिली. व्यसनांधीनता मधील तंबाखूजन्य पदार्थ मुळे होणारे तोटे व रोगा विषयी मार्गदर्शन केले. कुमारीमाता व करियर विषयक  मार्गदर्शन करून चांगल्या सवयी लागावे करिता उपाययोजना विषयी महिती दिली.कोरोणा पासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय व खबरदारी घ्यावयाची आहे या संबंधी समुपदेशक मनीषा साखरकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सुरज हेमके तर आभार क्रुष्नामाई खुणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानीं सहकार्य केले.





आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944

Share

Other News

ताज्या बातम्या