माहिती अधिकारातून माहिती उघड- ग्रामपंचायतने साधला सहा कोटीचा ग्रामविकास..!

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 27/02/2021 2:48 PM

किनगाव जटु ता. लोणार जि. बुलढाणा - येथील ग्रामपंचायत कार्यालयाने चौदाव्या वित्त आयोग निधीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात ग्रामविकास साधलेला आहे. यामुळे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आमचं गाव आमचा विकास या अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करुन मागील ५ वर्षात जवळपास  एकुण ६ कोटींची विविध विकासकामे करण्यात आली आहेत. सदर बाब ही माहिती अधिकारातून उघड झालेली असुन यामध्ये पुढील प्रमाणे विकासकामे करण्यात आलेली आहेत. मारोती मंदिर विहीर खोलीकरण, सरकारी विहिरीमध्ये आडवेबोअर, सोसायटी विहीर खोलीकरण, वसंत नगर,खापरखेडा लाड, किनगाव जटु,देवानगर,आमटी तांडा व बसस्थानक परिसर पाईपलाईन, शाळा सुरक्षा भिंत, घंटागाडी, ई लर्निंगसेट, गुरांसाठी पिण्याचा पाण्याचा हौद, स्मशानभूमी दुरुस्ती, ग्रामपंचायत भवन बांधकाम, समाज मंदिर दुरुस्ती, कन्या शाळा दुरुस्ती, विविध स्मशानभूमींचे बांधकाम, अंगणवाडी कुंपन, पोस्ट ऑफिस बांधकाम व आदी विकासकामे करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात सहा कोटी रुपये खर्च झाले परंतु कामाचा दर्जा अंत्यत बोगस असून यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध कामाची पाहणी करून चौकशी करणे आवश्यक आहे. प्रत्येक कामाच्या बिलाचा खर्च एवढा आहे की काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे परंतु कामे त्याप्रमाणे झालेली नाही असे दिसून येते. तसेच यातील ठराविक कामे ग्रामसभेतुन मंजूर केले तर काही विकासकामे आपआपसात व परस्पर ठराव मंजूर करुन करण्यात आल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाने विकासनिधी थेट ग्रामपंचायत खात्यात जमा करत असले तरी ग्रामस्थांना अंधारात ठेवून चार भिंतींच्या आत परस्पर ठराव घेऊन विकासनिधी दप्तरी खर्च करण्याचा प्रकार ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारातुन पहायला मिळत असतो. याबाबत सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या