राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण.

  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 19/01/2021 1:15 PM

महाराष्ट्र दिनांक :१९आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार (Corona vaccination four days a week in Maharashtra) असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण ( Corona vaccine) करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी यावेळी केले. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination ) आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी हे आवाहन केले आहे.  

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले. लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या