....तर कोरोनामुळे एक पिढीच धोक्यात.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 22/11/2020 8:22 PM

यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफने 140 देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं आहे.  या सर्वेक्षणाच्या अहवालातून एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भात माहिती समोर आली आहे. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी आणि असमानतेचा समावेश करण्यात आला आहे.

या संघटनेचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही तर जवळपास 20 लाख मुलांचा पुढील 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफनं व्यक्त केलं आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या