नेहरू युवा केंद्र संघटन गडचिरोली अंतर्गत युवा संकल्प संस्था द्वारा सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 31/10/2020 11:07 PM

चामोर्शी/ भेंडाळा :- 

आज 31 ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री व उप-प्रधानमंत्री तसेच भारताचे लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती किसन भवन मध्ये साजरी करण्यात आली आणि तसेच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. नेहरू युवा केंद्र गडचिरोली अंतर्गत युवा संकल्प संस्था, भेंडाळा द्वारा हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच प्रास्ताविक पवन अभारे ता.स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र गडचिरोली, यांनी केले व त्यात म्हणाले की जोपर्यंत युवा वर्ग एकत्रित येऊन एकता दिवस साजरा करणार नाहीत तोपर्यंत देशात खरी एकता सफल होणार नाही ,तसेच त्यांनी  कार्यक्रमाला उपस्थित सर्वाना एकतेचि शपथ घ्यायला लावली,त्या मध्ये युवा पिढीला  सौ.धर्माशीला सहारे पं. स.स.चामोर्शी व श्रीरंग मशाखेत्री पो.पा.भेंडाळा  यांनी मार्गदर्शन केले व. त्याचप्रमाणे एकता दिनानिमित्त रन फॉर  युनटी  हा उपक्रम राबविण्यात आले या मध्ये शंभर मीटर दौड स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये पन्नास युवकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. धर्माशीला सहारे  पंचायत समिती सदस्या चामोर्शी,प्रमुख अतिथी रंगजी मशाखेत्री पोलीस पाटील भेंडाळा, प्रमोदजी गोर्लावार सामाजिक कार्यकर्ता भेंडाळा,प्रमोदजी सहारे, किशोर बुरे लोकशाही वार्ताहार, नेहरु  युवा केंद्र गडचिरोली तालुका स्वयंसेवक चामोर्शी पवन आभारे, युवा संकल्प संस्था संस्थापक/ अध्यक्ष.राहुल 
 वैरागडे, युवा संकल्प संस्थेचे उपाध्यक्ष चेतन कोकावार,युवा संकल्प विभागीय उपप्रमुख देवा तुंबडे,युवा संकल्प चामोर्शी ग्रुप उपप्रमुख प्रशांत चुधरी, सदस्य अक्षय गुरुनूले,  क्रांती तुंबडे,मनोज तुंबडे,प्रशांत कुसराम, वासल्या बुरे,अश्विन सोनटक्के,वैभव तुंबडे, प्रमोद पाल, जालेंद्र पोरटे ,वीर शिवाजी युवा मंडळ वाघोली, श्री युवा मंडळ फराडा ,जगदंब युवा मंडळ कळमगाव, बाल शिवाजी युवा मंडळ कान्होली, समस्त युवा संकल्प आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.




चामोर्शी प्रतिनिधी 
9579683087

Share

Other News

ताज्या बातम्या