यंदा रब्बी हंगामाकरिता इटियाडोह कालव्याच्या पाणी सुरू करा - आ. कृष्णा गजबे

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 31/10/2020 10:47 PM

!! आ. कृष्णा गजबे यांची पाणी पुरवठा कार्यालयात बैठक संपन्न !!

◆ कालव्यामध्ये ८६ टक्के पाणी उपलब्ध , 
 = रब्बी हंगाम होणार 
    = शेतकऱ्यांना दिलासा
=आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

◆ पाणी पुरवठा संस्था अध्यक्षा कडून आ. कृष्णा गजबे यांचा सत्कार

इटियाडोह :-

                आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मुखत्व देसाईगंज , आरमोरी तालुक्यातील अनेक गावे गाढवी नदी काढी वसलेले आहेत . धान्य पीक येथील प्रमुख व्यवसाय आहे . परंतु चालू वर्षी निसर्गाने साफ निरास केले . वेळेवर पाणी न पडल्याने उशिरा लागवड करावी लागली , लागवड केली तर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला , या मुळे उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचे चिन्ह दिसत आहे..
             शेकऱ्यांनी पीक कर्ज काढून शेतीसाठी पैसा लावला जर उत्पादन नाही झाला तर का करावं ? घर खर्च , शेतीच खर्च कसं करायचं , अश्या अनेक समस्या शेतकरी वर्गात निर्माण होताना दिसत होत्या , परंतु आ. कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हातील इटियाडोह येथील पाणी पुरवठा कार्यालयामध्ये अधिकाऱ्याची बैठक पार पडली.
बैठकिमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली..
            कालव्यामध्ये ८६ टक्के पाणी उपलब्ध असून या वर्षी रब्बी हंगामाकरिता पाणी उपलब्ध होणार आहे, या बैठकीत आ. कृष्णा गजबे यांनी अनेक समस्या मांडल्या पाणी वेळेवर न सोडणे , पीक पूर्णत्व पूर्ण झाले तर मध्येच कालव्याचे पाणी बंद करणे .अश्या अनेक समस्या पाणी पुरवठा संस्थाला निर्दनास आणून दिल्या , व त्यांचा कडून या वर्षी अश्या अडचणी होणार नाही सकारात्म उत्तर मिळाले .
या वेळी चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी / मोर , सोनटक्के  अधीक्षक पाटबंधारे भंडारा ,  नामदेव सोरते अध्यक्ष प्रकल्पस्तरीय पाणी पुरवठा संस्था गोठणगांव तसेच आरमोरी,देसाईगंज,लाखांदूर, अर्जुनी/मोर,तालुक्यातील पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.









संतोष मंडल (गडचिरोली जिल्हा सहसंपादक)
9421735928

Share

Other News

ताज्या बातम्या