आधुनिक व व्यावसायिक जिल्हा क्रीडा संकुल करण्यासाठी प्रयत्न करा :- पालकमंत्री जयंत पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/10/2020 7:21 PM



सांगली, दि. 31, 

     जिल्हा क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून आधुनिक व व्यावसायिक असे जिल्हा क्रीडा संकुल करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात सद्यस्थितीत असलेल्या सोयी सुविधा व चालू असलेल्या कामकाजाबाबत आढावा घेऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, चांगल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळात दर्जेदार खेळाडू घडतील यासाठी सातत्याने प्रयत्न करावा. चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्यास उत्पन्न वाढेल, असे ते म्हणाले. 
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या रचनेबाबत माहिती देऊन जिल्हा क्रीडा संकुलातील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या