BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा; अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई;प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/08/2026 12:48 PM

नांदेड : BH (भारत) सिरीज अंतर्गत नोंदणीकृत वाहनधारकांनी थकीत वाहन कर तातडीने भरावा, अन्यथा विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, BH सिरीज वाहनांचा कर नोंदणीवेळी दोन वर्षांसाठी स्वीकारला जातो. त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी वाहनाचा कर भरणे बंधनकारक आहे. कर भरण्याची मुदत संपल्यानंतर सात दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो. त्यानंतरही कर न भरल्यास प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो.

कार्यालयाच्या संगणकीय अभिलेखांनुसार सध्या काही BH सिरीज वाहनांचा कर थकीत असून संबंधित वाहनधारकांनी विलंब न करता थकीत कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत कराची वसुली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडमार्फत लवकरच विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान थकीत कर असलेली वाहने आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंफरे यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या