काळ्या खणीचा पांग कधी फिटणार, डर्टी शो कधी थांबणार ??? : लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांचा सवाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/07/2026 10:39 PM

भ्रष्टाचाराचे कुरण हे फक्त जमिनीचे नसते किंवा भूखंडचे नसते 
ते काळी खण सुद्धा असू शकते हे दाखवून दिले आहे महापालिकेने . डर्टी शो दाखवून,

 सार्वजनिक बांधकाम विभागाचा मालकीचा  रस्ता, ना महापालिका वर्ग , ना देखभाल, ना  दुरुस्ती साठी ,
नाही मनपाची  मालकी असे असताना त्याच्यावर करोड रुपये चा खर्च केला गेला आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग देखील मूग गिळून गप्प का, हे कळत नाही, कदाचित चागलं काही तर करत आहे या गोड गैरसमज करून घेऊन बसलेले दिसतात.

अतिक्रमणची कथा  तर जगा वेगळीच आहे 

नगर रचना विभाग बांधकाम परमिशन ठेकदार  देत नाही तो जातो कोर्ट, विभाग 
कारण  मोठे नमूद करतात रस्त्याने बाधित आहे असे सांगून चारी दिशेला नगारा वाजवतो.


मनपाचे बांधकाम विभाग त्या रस्त्याचा जागेवर बेकायदेशीर गाळे बांधकाम करून महापालिका महान किती ते दाखवून देते .

हा कारभार फक्त सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्येच होऊ शकतो.

 कारभारी नसल्याचा फायदा घेऊन प्रशासनातील होतकरू आणि हाचलकी मध्ये फेमस असलेली कर्तबगार अधिकारी ज्या वेळेला जनतेचे मनोरंजन करण्यासाठी आपला खिशामध्ये पैसा दाबन्याची करमत असे समजते 

तेव्हा लोक टाळ्या वाजवून वाजत गाजत पालक. .....च्या सोबत उद्घाटन करतात, नुसता जल्लोष साजरा करतात हा प्रकार फक्त सांगलीमध्येच पाहायला मिळणार. कोण कायदेशीर कोण बेकायदेशीर हे कळण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही,असे वातावरण सोशल मीडियावर रिल्स व्हायरल  करून करतात,

 कोरोना  महापूर या   काळात आपली काळी जादू दाखवून गेलेले श्रेष्ठ  अधिकारी जेव्हा चार वर्षे घरात बसून  असतात,तेव्हा लोक त्याचा अभ्यास करायला लागतात ,  याचे  ऑडिट का झाले नाही एकच प्रश्न उरावर घेऊन बसतात,

काळी खण ही सुशोभित का झाली याचा साक्षात्कार 

त्यानंतरच परत  तीन आयुक्त काम करतात आणि सुशोभीकरणाच्या नावावर बेकायदेशीर अतिक्रमण करून
आपली तत्परता दाखवून दिली आहे. 

हा डर्टी शो कधी थांबणार सामाजिक कार्यकर्ते रस्त्या उतरून आंदोलन करून वेळोवेळी याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करतात ,
पण हे पालथ्या गडावर पाणी या म्हणी प्रमाणे पुन्हा एक आयुक्त ,पुन्हा एक शो, पुन्हा चमकुगीर करणारा एक अधिकारी,
 हे वातावरण किती चांगले आहे रसभरी कथा पुन्हा एकदा सोशल मीडिया,
 डर्टी शो एंटरटेनमेंट इंटरटेनमेंट इंटरटेनमेंट चालूच राहणार
                           - मनोज भिसे 
                  अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या