मनपाच्या गल्ल्यात पेव्हिंगचे गाणे,
रस्ते मात्र बुडतात, पैसा वाहतो नदीप्रमाणे!
आयुक्त साहेब नेत्रप्रभा अंजन लावून बघतात,
पण दोषी सापडत नाही...
कारण सगळेच कागदावर "नियमात" दिसतात!
कुंपणच शेत खातंय, हे गणित फार सोपं,
पण उत्तर शोधायला कुणी तयार नाही.
N-CAP फंडाच्या नावाखाली पेव्हिंगचे डोंगर,
झाडे, हरित पट्टे आणि पर्यावरण मात्र कोपऱ्यात उभे!
शहर अभियंता विभाग कानावर हात, डोळे बंद,
आणि एकच सूर –
"सर्व काही नियमानुसार सुरू आहे!"
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (सिव्हिल हॉस्पिटलजवळ) आणि राजवाडा चौक तसेच कॉलेज कॉर्नर येथे कामे सुरू आहेत.
नागरिकांचा प्रश्न एवढाच —
N-CAP फंडातून पेव्हिंग ब्लॉकच बसवायचे असतील,
तर झाडे नेमकी कोणत्या फंडातून लावायची?
रस्ते खड्ड्यात,
जनता त्रस्त,
आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच –
"हा विकास आहे!"
आयुक्त महोदय,
मंजुरी देण्यापूर्वी फक्त फाईल नका पाहू,
एकदा प्रत्यक्ष रस्त्यावरही फिरा.
नाहीतर हा "पेव्हिंगचा भाम्या रोग"
असाच वाढत राहील...
🚧 जय मनपा!
🚧 जय पेव्हिंग!
🚧 जय N-CAP!
🚧 आणि खड्ड्यांमध्ये फुललेली लोकशाही!
मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली