श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , सांगली येथे सहाय्यक शिक्षिका सौ राजश्री राजेंद्र पेटारे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी ल.ए.सोसायटीचे चेअरमन मा. श्री शांतिनाथ कांते, ऑनररी सेक्रेटरी मा. श्री सुहास पाटील, शाळा समिती चेअरमन मा.श्रीमती अनिता पाटील, मुख्याध्यापक श्री बी बी सावळवाडे, पर्यवेक्षिका सौ जे एस इचलकरंजे, प्रमुख पाहुणे श्री दीपक सूर्यवंशी, श्री राजेंद्र पेटारे उपस्थित होते.
प्रथम प्रमुख पाहुणे श्री दीपक सूर्यवंशी व सर्व मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री बी बी सावळवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका सौ. जे एस इचलकरंजे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर चेअरमन मा. श्री शांतिनाथ कांते ,सेक्रेटरी मा. श्री सुहास पाटील ,शाळा समिती चेअरमन श्रीमती अनिता पाटील यांच्या हस्ते सौ राजश्री पेटारे यांचा आहेर ,चांदीची भेट वस्तू, आण्णासाहेब लठ्ठे यांचा फोटो व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
सहाय्यक शिक्षिका सौ स्मिता पाटील, श्री सातगोंडा पाटील, श्री पुरुषोत्तम अरविंद पेटारे , श्री महेश मनोहर कांबळे, सौ पुष्पा मनोहर कांबळे , सौ लतिका अरविंद पेटारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे दीपक सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती सौ राजश्री राजेंद्र पेटारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळा समिती चेअरमन श्रीमती अनिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
सौ राजश्री पेटारे यांची एकूण सेवा 37वर्ष झाली. रोटरी क्लब जयसिंगपूर, आदर्श शिक्षिका , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, असोसिएशन ऑफ इनरव्हील क्लब इन इंडिया आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.
सौ रेखा चौधरी यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. सौ नीता चौगुले व श्री प्रसन्न शेटे यांनी सूत्रसंचालन केले
सौ राजश्री राजेंद्र पेटारे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.