अनधिकृत जाहिरात होर्डींगवर महापालिकेची धडक कारवाई;“अशोक नगर परिक्षेत्रात गुन्हा दाखल”

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/06/2026 7:05 PM

नांदेड : नांदेड शहरातील मध्यवर्ती भागात अशोक नगर झोन क्र.०२ अंतर्गत महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डींग्सवर धडक कार्यवाही करुन वसंतराव नाईक पुतळा ते अशोक नगर या रस्त्यावर हॉटेल तुलसी कम्फर्टच्या समोरील सेंटर पोल अर्थात मध्यवर्ती खांबावर अनिधिकृत बॅनर लावणारे *वेदांत शैलेंद्र सबलोक, प्रतिमा शैलेंद्र सबलोक* यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणारे *रुपेश शेळके* या व्यक्तीविरुध्द विमानतळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण १६७ ठिकाणे निश्चित केले असुन सदरील ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असुन त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु,शहरात अशोक नगर परिक्षेत्रात वाणिज्य स्वरूपाची जाहिरात विनापरवानगी लावण्यात आल्याचे दिनांक २०.०६.२०२६ रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्यामुळे संबंधीत व्यक्ती विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे महानगरपालिके तर्फे फिर्याद क्र. ०२९०/२०२६  दिनांक २०.०६.२०२६ रोजी नोंदविण्यात आली आहे. सदरील कारवाई *पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षे‍त्रिय अधिकारी राजेश जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन गजभारे, उत्तर नांदेडचे अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर व त्यांच्या अतिक्रमण पथकाने पार पाडली आहे.

*अधिकृत होर्डिंगच्या परवानगीसाठी महापालिकेची सुलभ व्यवस्था*
महापालिकेने होर्डीग्ससाठी ऑनलाईन स्वरुपात परवानगीची सुविध उपलब्ध करुन दिली असुन ४८ तासांच्या आत परवानगी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वांसाठी किमान ३ दिवसांची बॅनर, होर्डींग्स लावण्याची परवानगी असणार असुन अतिशय अल्प दरात ही सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिकेने तात्पुरते जाहिरात फलकांना परवानगी देण्यासाठी शहरात एकुण १६७ ठिकाण निश्चित केले आहेत.
नागरिकांना सदररील ठिकाणी होर्डिंग्स अथवा बॅनर लावण्यासाठी ऑनलाइन स्वरूपात परवानगी दिली जाते. या परवानगीसाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येतो. ऑनलाइन स्वरूपात अर्ज प्राप्त झाल्यानंतर क्षत्रिय अधिकारी त्यास परवानगी देतात. प्राप्त परवानगी पत्रावर शासन निर्णयानुसार क्यू. आर.कोड उपलब्ध करून दिला जातो. तो बॅनरच्या दर्शनी भागावर लावणे अनिवार्य आहे.

शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळावर परवानगी घेऊन होर्डींग्स लावावेत त्याचप्रमाणे अनधिकृत जाहिरात फलक लावुन शहर विद्रुपीकरण न करता महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर भूमिका घेत अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या