टाकळीकर पाटील कुटुंबाची दुहेरी यशोगाथा; संस्कारला एमएचटी-सीईटीमध्ये 99.40 टक्के;साक्षी पाटील हिचे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/06/2026 6:56 PM

नांदेड  : गुणवत्तेची परंपरा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर पाटील कुटुंबातील संस्कार संजय पाटील आणि साक्षी संजय पाटील यांनी शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
बरबडा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या संस्कार संजय पाटील याने एमएचटी-सीईटी (पीसीएम गट) परीक्षेत तब्बल 99.40 पर्सेंटाईल मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. यापूर्वी त्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेत 96 टक्के गुण मिळविले होते. तसेच दहावीची परीक्षा किड्स किंग्डम सीबीएसई स्कूलमधून 97 टक्के गुणांसह उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली होती.
संस्कारची बहीण साक्षी संजय पाटील हिने देखील शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. तिने जेईई परीक्षेत 99.76 पर्सेंटाईल मिळविले. त्यानंतर भारतातील नामांकित स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (एसपीए), भोपाळ येथून बी.आर्क. पदवी शिक्षणादरम्यान 9.9 सीजीपीए प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. सध्या ती पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असून तिच्या उत्कृष्ट प्रकल्पांमुळे अल्पावधीतच तिला माजी मंत्री दिलीप वळसे  पाटील यांच्या निवासस्थानाच्या वास्तुरचनेचे तसेच दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पांशी संबंधित वास्तुरचना करण्याची संधी मिळाली आहे.
संस्कार आणि साक्षी यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार अमर राजूरकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन पाटील टाकळीकर, मार्गव अकॅडमीचे भार्गव राजे सर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, भोकर नगर परिषदेचे उपाध्यक्ष युसूफभाई, लोहाचे माजी नगराध्यक्ष दत्ता वाले, उद्योजक संभाजी पाटील, राम निदाणकर तसेच व्यंकटेश्वरा नगर परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे. तसेच मित्र परिवार यांच्या कडून पण शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. 
पाटील कुटुंबातील या दुहेरी यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, या दोन्ही भावंडांनी मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या