छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दिनांक 15 मे 2026 रोजी भगूर येथील नूतन विद्यामंदिर येथे संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप आहेर मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच माननीय तहसीलदार नाशिक श्री पंकज पवार तसेच भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री प्रसाद आडके असे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये 18 फेरफार मंजूर करण्यात आले. तसेच सातबारा दुरुस्ती साठी सात प्रकरण प्राप्त झाले. तसेच 28 खाते उतारे व 40 सातबारा उतारे यांचे वाटप करण्यात आले. एकूण आधार कार्ड तसेच जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला व नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला असे 58 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक अर्थसाह्य योजना मध्ये श्रावणबाळ योजनेअंतर्गत सात लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर घोळवे ग्राम महसूल अधिकारी नानेगाव यांनी केले. तसेच नूतन शाळेचे मुख्याध्यापक श्री कवडे सर यांनी प्रशासनाचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंकज पवार तहसीलदार नाशिक यांनी केले तसेच श्री संदीप आहेर मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब यांनी मुद्रांक विभागाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन. मंडळ अधिकारी भगूर श्री शरद बेंडकुळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील ग्राम महसूल अधिकारी दिपाली धनगर , कांचन वाणी, अमित पाटील. सुधीर उगले केले व महसूल सेवक राजू गायकवाड मोहन
वालझाडे तुषार कुंडारिया वासुदेव बोंबले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली