*सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या लढ्याला अखेर यश*
*बेंगळुरू-सांगली-मुंबई प्रवास*
🟡 गाडी क्रमांक 16553 बंगळुरू- मुंबई एक्सप्रेस बेंगलोर इथून शनिवारी व मंगळवारी रात्री साडेआठ वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सांगली स्टेशनवर येईल.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सकाळी 11:05 वाजता सुटून ही गाडी रात्री 8:40 मिनिटांनी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.
*मुंबई-सांगली-बेंगळुरू प्रवास*
🟡 गाडी क्रमांक 16554 मुंबई - बंगळुरू एक्सप्रेस मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रविवारी व बुधवारी रात्री 11:15 वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी 8:20 वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर पोहोचेल.
सांगली स्टेशन वरून सकाळी 8:25 वाजता निघून ही गाडी बेंगलोरला रात्री 10:30 पोहोचेल.
*मुंबई-सांगली-बेंगळुरू दरम्यान गाडीचे थांबे*
मुंबई ते बेंगलोर दरम्यानच्या दोन्ही दिशेच्या प्रवासात या गाडीला ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी येथे थांबा दिलेला आहे.
*तिकीट काढताना घेण्याची खबरदारी*
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सांगली ते मुंबई व सांगली ते बंगळूर या मार्गावर जास्तीत जास्त तिकिटे काढून सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करावा. तिकीट काढताना फॉर्मवर व तिकिटावर प्रवाशाच्या सुरुवातीचे स्टेशन सांगली टाकावे.
एजंट कडून तिकीट घेत असल्यास तिकिटावर प्रवाशाच्या सुरुवातीचे स्टेशन सांगली असेल तरच तिकिटाचे पैसे द्यावे.
*सांगली स्टेशन पोहोचणे सोपे आहे*
विटा तासगाव कवलापूर बुधगाव माधवनगर येथील लोकांनी एसटी बसने सांगली कॉलेज कॉर्नरला उतरून तिथून चालत किंवा रिक्षाने सांगली स्टेशन गाठावे. शिराळा पेठ नाका ईश्वरपूर आष्टा इत्यादी परिसरातील लोकांनी एसटी बसने सांगली महानगरपालिका येथे उतरावे व तिथून रिक्षाने सांगली स्टेशन गाठावे.
ही गाडी 23 मे पासून बेंगलोर हून सुरू होईल व 24 मे पासून मुंबईहून सुरू होईल.
*सांगली रेल्वे स्टेशनवर कमर्शियल व्यावसायिक थांबा मिळवण्यासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने पीएम मोदीजींकडे तक्रार केल्यानंतर सांगलीत कायमी कमर्शियल थांबा देण्यात आला*
या गाडीचे वेळापत्रक 9 मे रोजी जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीला चक्क टेक्निकल थांबा देण्यात आला असल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते पण सांगली जिल्हा जागृती मंचने आक्रमक भूमिका घेत पीएम मोदींकडे तक्रार करून शेवटी सांगली रेल्वे स्टेशनवर सांगली बेंगलोर एक्सप्रेस गाडीला कमर्शियल व्यावसायिक थांबा मिळवून दिला अशी माहिती अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली. सांगली जिल्हा मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनवर मुंबई बंगलोर एक्सप्रेस ला व्यवसायिक थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.