नांदेड:- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी परभणी शहरात पोलीस पथकाची रवानगी केली होती.
सदर पथकाने, दिनांक 23/04/2026 रोजी, परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता मार्केट व जुना मोंढा या ठिकाणी शटरमध्ये चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, 24,990/- रुपयांची रोकड व 25 हजार रुपयांचे (5) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (6) आरोपीतांविरुध्द नानलपेठ पोलीस ठाणे येथे गुरनं 302/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्या अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास नानलपेठ पोलीस ठाण्यातील पोहेकॉ / ईश्वर रासवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्यानंतर, पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमी रोडवरील एम. आर. हॉटेल या ठिकाणी शटरमध्ये चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, 7,920/- रुपयांची रोकड व 11,000 रुपयांचे (2) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (4) आरोपीतांविरुध्द कोतवाली पोलीस ठाणे येथे गुरनं 192/2026 कलम 49 बी.एन.एस. सह 12 (अ), महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्यातील पोहेकॉ / ताटीकुंडलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपरोक्त दोन्ही कारवायांत, पोलीस पथकाने एकूण 32,910/- रुपयांची रोकड, (7) मोबाईल व साहित्य असा एकूण 68,910/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण (10) आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
' खबर ' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांकडे पोहोचाविता यावी, या
दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.