आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय दूध डेरी पुनर्जीवित करण्यात आली पाहिजे
उदगीर येथील बंद पडलेली डेरी सुरू करण्यासाठी राज्य सरकार 125 कोटी रुपये देत आहे मग आपल्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मिरज शासकीय दूध डेरी चालू करण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत..? का त्यांचा त्या 58 एकर जागेवर डोळा आहे..?
नुसत्या निवडणुकीच्या काळात सभेमध्ये भाषणे करायची कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा जगाचा तारण करता आहे मात्र त्याच्या शेती व्यवसायाला पूरक असणाऱ्या दूध व्यवसायासाठी शासकीय दुध डेअरी परत चालू करण्यासाठी मात्र उदासीनता
आयटी पार्क साठी शेजारच्या जिल्ह्यामध्ये 50 एकर प्लस जागा देण्यात येत आहेत मात्र सांगली जिल्ह्यातील आयटी साठी फक्त चार एकर जागा देण्यात आली आहे याबाबत सुद्धा कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही महापालिका काय झालंय सत्ता कोणाची आली जिल्हा परिषद मध्ये कोणाची जिरली मग मंदिराचा जीर्णोद्धार आपले कारखाने आपल्या बँका आपल्या सोसायटी व्यवस्थित चालल्या म्हणजे सगळं कर्तव्य पूर्ण झालं असंच जणू काही आपल्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना वाटतं
मोठा उद्योग नाही विमानतळ नाही ड्रायपोर्ट नाही आयटी पार्क नाही नुसते यांच्या मागण फिरायचं आणि जयजयकार करायचा
सध्या तर डेरीमिल्क कॅडबरी याची चर्चा आहे मग प्रशासन असेल राज्यकर्ते असतील धन्य ती जनता धन्य ती प्रजा आणि धन्य ते राज्यकर्ते धन्य ते प्रशासन कॅडबरीत मशगुल...
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा