मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यांची 127 वी बैठक मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीमध्ये सातारा कराड मिरज कोल्हापूर विभागातील रेल्वे सेवा बाबत विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर मिरज कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत व सुकुमार पाटील यांनी केली.
रेल्वेचे महाप्रबंधक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी लवकरच मिरज जंक्शन च्या नूतनीकरणाचे कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी झोन कडून ज्यादा समर स्पेशल गाड्या सोडल्या जातात परंतु मध्य रेल्वे कडून का सोडल्या जात नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना येणार्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर मिरज कलबुर्गी, कोल्हापूर लातूर, मिरज जयनगर, कोल्हापूर कटिहार या मार्गावर स्पेशल गाड्या सोडण्याणार असल्याचे सांगितले.
स्थानक सल्लागार समिती सदस्यांचे ही निवडीही लवकरच करणार असल्याचेही सांगण्यात आले.
भिलवडी स्थानकाचे फूट ओव्हर ब्रिज गेल्या कित्येक वर्षापासून तयार नसल्याने सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जाब विचारले असता येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले
ताकारी स्थानकावर कोयना एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांना थाब्याची मागणी असून कोयना एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल्वे बोर्डेकडे प्रस्ताव पाठवल्याचे व महाराष्ट्र एक्सप्रेस साठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.
सह्याद्री एक्सप्रेस नवीन नंबर सह खडकी पर्यंत चालवली जाईल त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ही गाडी पनवेल पर्यंत पाठवण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले.
मिरज हजरत निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस या गाडीच्या मिरज मधून सुटण्याच्या वेळामध्ये ही अर्धा तासाने बदल करणार असल्याचेही सांगण्यात आले.
मिरज पंढरपूर कुर्डूवाडी या मार्गावर सकाळी दुपारी व संध्याकाळी विशेष डेमो सोडण्याचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले
सांगली परळी एक्सप्रेस डेमो ऐवजी आयसीएफ डब्यांची सोडण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले
यावेळी रेल्वे महाप्रबंधक श्री राजीव श्रीवास्तव, डीजीएम श्री. कुश किशोर मिश्रा, ए डी जी एम श्री. अमित मंडल, श्रीयुत उमंग दुबे, श्री.मिलिंद हिरवे, डॉ.स्वप्नील नीला या अधिकाऱ्या समवेत या भागातील मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, सुकुमार पाटील,
शिवनाथ बियाणी, बाबा निंबाळकर आदी उपस्थित होते.