देगलूर नाका परिसरातील चार शाळकरी मुलांचा मृत्यु झालेल्या दुर्घटने संदर्भात महानगरपालिके मार्फत करण्यात आलेल्या करवाईची वस्तुनिष्ठ माहिती

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/04/2026 8:03 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालका हद्दीतील देगलुर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या पाठीमागे इस्लामपुरा भागात खड्यात साचलेल्या पाण्यात बुडुन चार शाळकरी मुलांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदरील प्रकरणी महानगरपालिकेने नियमानुसार आवश्यकती कार्यवाही केली आहे.

तथापी, मागील काही दिवसांपासुन काही वर्तमानपत्रामध्ये तसेच समाज माध्यमांवर महानगरपालिके मार्फत कारवाई करण्यासाठी विलंब होत असल्याच्या तथ्यहीन व अर्धवट माहितीच्या आधारावर बातम्या प्रसिध्द होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या प्रकरणात महापालिकेने नियमानुसार आवश्यकती केलेल्या कार्यवाहीची वस्तुनिष्ठ माहिती खालील प्रमाणे आहे.

◆ सदरील प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा फरहतउल्ला बेग यांची व्दिसदस्यीय समिती त्याच दिवशी नेमण्यात आली होती व समितीला 24 तासांच्या आत अहवाल देण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते.

◆ चौकशी समितीने 24 तासांच्या आत सादर केलेल्या अहवालानुसार कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे शिवकन्या जायभाये, उप अभियंता (सा.बा.वि.) आणि किरण सुर्यवंशी कनिष्ठ अभियंता (सा.बा.वि.) यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

◆ तसेच महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री दिलीप टाकळीकर, प्र.कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागातील  प्रकाश कांबळे, उप अभियंता  व म.जकीउल्ला खान यांना कामात निष्काळजीपणा केल्याबाबत निलंबीत का करण्यात येवू नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस देवुन (48) तासाच्या आत खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले आहे.

◆ पोलीस स्टेशन इतवारा यांनी दिनांक 16.04.2026 रोजी घडलेल्या घटनेच्या अंनुषंगाने मागविलेल्या लेखी माहितीनुसार कार्यालयीन पत्र जा.क्र.नांवाशमनपा/साबांवि/583/2026, दि.17.04.2026 अन्वये सदर प्रकरणाची माहिती पुरविण्यात आली आहे.

◆ सदर दुर्घटनेस जबाबदार असलेले कंत्राटदार मे.गुरु रामदास कंन्स्ट्रक्शन, नांदेड  यांचे संबंधित प्रकल्प अभियंता /प्रकल्प पर्यवेक्षक /कामावर देखरेख करणारे व्यक्ती व घटनास्थळाच्या पुर्वेस प्लॉट नं.5, सर्व्हे नं.158, आयशा पार्क येथील खाजगी बांधकामधारक मो.युसूफ मकराणी यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी प्र.शहर अभियंता सुमंत पाटील यांना कार्यालयीन आदेश जा.क्र.नांवाशमनपा/साप्रवि/आस्था-1/639/2026, दिनांक 17.04.2026 अन्वये प्राधिकृत करण्यात आले होते.

◆ प्राधिकृत अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा येथे गेले असता त्याचदिवशी या प्रकरणात मयताचे नातेवाईक सय्यद फेरोज सय्यद गैस यांनी इतवारा पोलीस स्टेशन येथे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या इसमाविरुध्द दिनांक 17.04.2026 रोजी FIR क्र.0118 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

◆ या सर्व पार्श्वभुमीवर पालिका आयुक्तांनी शहर अभियंता यांना प्राधिकृत केल्यानुसार शहर अभियंता यांनी दि.18.04.206 रोजी कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड यांचे संबंधीत पर्यवेक्षक सुरेश शेषेराव सोनकांबळे तसेच नाल्याचा प्रवाह मुरुम साहित्याचा भरणा करुन रोखणारे खाजगी बांधकाम धारक मो.युसुफ मकराणी यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दाखल केली असता या प्रकरणात मयत नातेवाईकामार्फत यापूर्वीच FIR दाखल झालेली असल्याने पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेची स्वतंत्र FIR न घेता यापूर्वी दाखल झालेल्या FIR मध्ये अर्थात FIR क्र.0118 यामध्ये महापालिकेच्या तक्रारीची नोंद घेऊन मुळ तक्रारीमध्ये आरोपींची नावे समाविष्ट केली आहेत.

◆ या दुर्घटनेस जबाबदार असलेले कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन,नांदेड यांना दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यासाठी निर्देशीत केल्यानुसार संबंधीत कंत्राटदाराने मयत मुलाच्या नातेवाईकास प्रत्येकी रु.15 लक्ष या प्रमाणे एकुण रु.60 लक्ष नुकसान भरपाई दिली असल्याचे कळविले आहे.

◆ त्याचप्रमाणे दुर्घटनेतील मृतांच्या नोतवाईकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेतुन मदत प्राप्त होण्यासाठी शिक्षधिकारी (योजना), जिल्हा परिषद, नांदेड यांच्याकडे रितसर प्रस्ताव दि.21.04.2026 रोजी दाखल करण्यात आला असुन या योजनेतुन मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकास प्रत्येकी रु.1.50 लक्ष मदत प्राप्त होणार आहे.

◆ या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन प्रस्तुत प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल यापूर्वीच अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई व मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांना सादर करण्यात आला आहे.

देगलुर नाका भागात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असुन या प्रकरणात प्राथमिक स्तरावर कामात निष्काळजीपणा / दिरंगाई केलेल्या अभियत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असुन पोलीस प्रशासनाच्या प्रक्रियेनुसार संबंधीत कंत्राटदार व खाजगी बांधाकामधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. सदरील दुर्दैवी घटनेबाबत महानगरपालिका प्रशासन गंभीर व संवेदनशील असुन आवश्यक अशी नियमोचित कारवाई तात्काळ करण्यात आली असुन अशा दुर्घटना होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्यात येत असल्याचे याव्दारे महापालिका प्रशासना मार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या