महाराष्ट्र पून्हा हादरले ; नाशिकमध्ये समोर आला अशोक खरातपेक्षा मोठा कांड ! टॅबमध्ये सापडलेत 87 व्हिडिओज, 100 महिलांचे शोषण
नाशिकच्या सातपूर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, ज्याने खंडणीची तक्रार दिली तोच फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे (६३) आता मुख्य आरोपी ठरला आहे. स्वतःला पत्रकार आणि एनजीओ संचालक म्हणवून घेणाऱ्या एरंडेने गेल्या काही काळात गरजू महिलांना, विशेषतः अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या अत्याचाराचे चित्रण त्याने नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेल्समध्ये गुपचूप केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या टॅब आणि पेनड्राइव्हमध्ये तब्बल ८७ अश्लील व्हिडिओ सापडले असून, सुमारे १०० हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे व्हिडिओ 'ब्लू फिल्म' स्वरूपात विकले गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला आपल्याकडे १२ लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार एरंडेने दिली होती, मात्र तपासादरम्यान पीडित महिलेने समोर येऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणातील इतर दुवे आणि व्हिडिओ विक्रीच्या रॅकेटचा सखोल तपास करत आहेत.
varsha shendge