भारतीय उच्चशिक्षण व संशोधनात 'इन्फ्लिबनेट' केंद्राचे योगदान महत्त्वपूर्ण - प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/03/2026 3:43 PM

नांदेड :- "भारतीय उच्चशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात 'इन्फ्लिबनेट' केंद्राचे योगदान अत्यंत मोलाचे असून, या केंद्राच्या विविध उपक्रम व सेवांचा लाभ केवळ विद्यापीठांनीच नव्हे तर संलग्नित महाविद्यालयांनीही घेतला पाहिजे," असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांनी केले. 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र व इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "युझर अवेयरनेस प्रोग्रॅम ऑन आयआरआयएनएस  अँड इन्फ्लिबनेट सर्विसेस फॉर स्कॉलरली कम्युनीटीज" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर येथील शास्त्रज्ञ हितेशकुमार सोळंकी व पल्लभ प्रधान यांनी इन्फ्लिबनेटच्या विविध सेवांची व उपक्रमांची सविस्तर तांत्रिक माहिती दिली. व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, अधिसभा सदस्य डॉ. विष्णू पवार आणि आयक्यूएसी संचालक डॉ. बी. एस. रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुंबई दूरदर्शनचे वृत्त निवेदक अमेय रानडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविंद्र लाठकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय अपर्णा वाघमारे व डॉ. शरद चव्हाण यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन डॉ. महेश स्वामी यांनी केले.
या कार्यशाळेत प्राध्यापक, ग्रंथपाल व संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. एस. बी. देशमुख, डॉ. अरुण हंबर्डे, सुनील जाधव, डॉ. राजीव वाघमारे, डॉ. वैजनाथ हंगरगे, विठ्ठल मोरे, संदीप डहाळे, के. एस. सिद्दीकी, मोहनसिंग पुजारी, कु. प्रमिला बडगे, नितीन राठोड, डी. एस. पोपळे, तिरुपती हंबर्डे  योगेश हंबर्डे व राहुल चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या